उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई तब्बल ३ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर (दि.२६ प्रतिनिधी):-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ अहिल्यानगर यांनी दि.२६ ऑक्टोबर २०२४ रोजी कर्जत तालुक्यातील धालवाडी शिवारात अविध हातभट्टी निर्मित करणारी ठिकाणे नष्ट करून मोठी कारवाई केली आहे.
यात एकूण तीन गुन्हे दाखल करून एकूण ३ लाख ४५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय उपआयुक्त श्री.सागर धोमकर, अहिल्यानगरचे अधीक्षक श्री.प्रमोद सोनोने, उपाधीक्षक श्री.प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक १ अहमदनगरचे निरीक्षक श्री.सुरज कुसळे,दुय्यम निरीक्षक आनंद जावळे, दुय्यम निरिक्षक एस.व्ही शिंदे,सर्वश्री जवान सुरज पवार,दीपक बर्डे व महिला जवान यांनी केली आहे.
अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मित,वाहतूक,विक्री व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती निरीक्षक श्री.सुरज कुसळे यांनी दिली.