Maharashtra247

आ.संग्राम जगताप यांचा नगर विकास यात्रेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांशी संवाद 

 

अहिल्यानगर प्रतिनिधी:-अहिल्यानगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून उमेदवारी जाहीर होताच आमदार संग्राम जगताप यांनी मतदारसंघात प्रचाराला वेग दिला आहे.आमदार संग्राम जगताप हे नगर विकास यात्रेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची संवाद साधत आहेत.

आज नगर विकास यात्रेची सुरुवात प्रभाग क्रमांक 9 मधील अण्णाभाऊ साठे चौकापासून करण्यात आली.त्यानंतर बौद्ध वस्ती,गणपती मंदिर,मुन्सिपल कॉलनी,महादेव मंदिर,करंदीकर हॉस्पिटल जवळील परिसर,विठ्ठलवाडी,वाघमळा, समाज मंदिर,बौद्धवस्ती,कवडे नगर,पत्रा कॉलनी,गवळीवाडा या भागातील मतदारांशी आमदार संग्राम जगताप यांनी नगर विकास यात्रेच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला.

प्रत्येक ठिकाणी मतदारांनी प्रचंड उत्साहात ढोल ताशाच्या गजरात आमदार संग्राम जगताप यांचे स्वागत केले.

नगर विकास यात्रेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील तरुण, जेष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.नगर विकास यात्रेदरम्यान चौकाचौकांमध्ये माता- भगिनींनी आमदार संग्राम जगताप यांचे औक्षण करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.नगर शहराची प्रगती कशी वेगाने होत आहे, काय कामे केली, येत्या पाच वर्षांत काय करायचं नियोजन आहे, हे सांगण्यासाठीच ही नगर विकास यात्रा काढण्यात आली आहे.

You cannot copy content of this page