वर्धा जिल्हा प्रतिनिधी(सागर झोरे):-दि.१६ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता रविंद्र भानारकर यांच्या घरी महर्षी वाल्मिकी भोई समाजसेवी संस्था वतीने स्व. खा.जतीरामजी बर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व “भोई गौरव मासिकाच्या वतीने काढण्यात आलेल्या स्व खा जतीराम बर्वे स्मृती ” विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले महर्षी वाल्मिकी भोई समाजसेवी संस्थेच्या वतीने तसेच भारत सामाजिक विकास ग्रुप देवळी फुटपाथ शाळा देशोन्नतीचे पत्रकार गणेश शेंडे,कवियित्री त्रिवेणी पचारे या सर्वांचा सत्कार करण्यात आला.स्व.खा.जतिरामजी बर्वे यांनी स्वार्थ बाजूला ठेवून सेवाभावाने आपले संपूर्ण आयुष्य देश आणि समाजाच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठीही समर्पित केले मत्स्यमहर्षी म्हणून विख्यात झालेले.असे विचार अध्यक्ष रविंद्र भानारकर यांनी व्यक्त केले.भोई गौरव मासिक विशेषांक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते.मच्छीमार समाजाला शासनातर्फे कोणतीही सवलत मिळत नव्हती म्हणून इतर समाजाप्रमाणे आमच्या समाजाला शासकीय सवलती कशा मिळतील याकरिता त्यांनी १९७९ ला सोक्ता भवन नागपूर येथे मोठा कार्यक्रम घेतला त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना मेळाव्याला बोलाविले. व या समाजाच्या अडचणी निषद केल्या त्यांच्याच प्रयत्नामुळे १९७४पासून फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित सवलतीचा फायदा २६ पोट जाती मच्छीमार समाजाला मिळून दिला काही का होईना या समाजाला व जतिराम बर्वें उन्नतिच्या उंबरठ्यावर आणून ठेवले असे विचार विजय पचारे यांनी व्यक्त केले.नागपूर येथून दरमहा मासिक प्रकाशित होत असलेले भोई समाजाचे मुखपत्र भोई गौरव मासिकाच्या स्व. खा. जतिरामजी बर्वे स्मृती विशेषांकाचे प्रकाशन दि.१६ जानेवारीला देवळी येथील स्थळ “महर्षी वाल्मिकी भोई समाजसेवी संस्था” कार्यलय रविंद्र भानारकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.याप्रसंगी शिरपूर सरपंच तथा भोई समाज अध्यक्ष रविंद्र भानारकर, आम आदमी पाटीचे तथा भोई समाज संस्था सचिव किरण पारीसे,भोई गौरव मासिक रविंद्र पारीसे,बोपापूर माजी ग्रा.प. सदस्य विजय पचारे,सुरेंद्र पचारे, सुभाष भानारकर, शंकर पारीसे, शंकर केवदे, मनोज शिवरकार, त्रिवेणी पचारे, मंदाबाई भानारकर, वसंतराव भानारकर, शंकर परतपुरे, पत्रकार गणेश शेंडे, किशोर केळवदे,बागडे तसेच महर्षी वाल्मिकी भोई समाजसेवी संस्थाचे सर्व पदाधिकारी व सदस्य गण आणि सर्व भोई बांधव उपस्थीत होते.
