नगर प्रतिनिधी (दि.१८ जानेवारी):-अहमदनगर महापालिकेतील स्थायी समितीत असलेल्या आठ सदस्यांची मुदत ३१ जानेवारीला संपत आहे.परंतु नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने नवीन सदस्यांच्या निवडी आचारसंहिता संपल्यावरच होणार असल्याचे समजते.यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन,शिवसेनेचे तीन,भाजपचे दोन तर बसपाचे एक नगरसेवक समाविष्ट आहेत.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे समद खान,मिना चव्हाण,शिवसेनेचे सचिन शिंदे,परसराम गायकवाड,रिता भाकरे,भाजपचे रवींद्र बारस्कर,वंदना ताठे तर बसपाचे मुदस्सर शेख यांचा समावेश आहे.नवीन स्थायी समिती सदस्य ३ फेब्रुवारी रोजी आचारसंहिता संपल्यानंतरच सदस्यांची निवड होऊ शकते.

