श्रीरामपूर शहरात ख्रिश्चन धर्मगुरूंवर होणारे हल्ले व धर्मांतराच्या नावाखाली होणारी विनाकारण बदनामीच्या निषेधार्थ ख्रिश्चन धर्मगुरू व बंधू भगिनींच्या वतीने मुकमोर्चाचे आयोजन यशस्वी
श्रीरामपूर प्रतिनिधी (दि.१८ जानेवारी):-श्रीरामपूर शहरात ख्रिश्चन धर्मगुरूवर होणारे हल्ले व धर्मांतराच्या नावाखाली होणारी विनाकारण बदनामी निषेधार्थ सकल मुकमोर्चा श्रीरामपूर शहरात मंगळवार दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठिक १०:००वाजता श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने ख्रिस्ती समाजावर होणारा अन्याय धर्मगुरू वर होणारे हल्ले,चर्चवर होणारे हल्ले, धार्मिक विंधीची विटंबना, धर्मांतरासाठी खोटे गुन्हे दाखल केले जाते यासंदर्भात श्रीरामपूर शहरात अखिल ख्रिस्ती समाजांच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात आला.या मुकमोर्चाची सूरूवात सकाळी ठिक १०:०० वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू होऊन मेन रोड,छत्रपती शिवाजी महाराज रोड ते प्रांत कार्यालय व तहसिलदार व प्रांत साहेब श्रीरामपूर यांना यावेळी निवेदन देण्यात आले.सदर मोर्चामध्ये लोयोला चर्च श्रीरामपूर,सेंट झेवियर चर्च टिळकनगर,संत तेरेसा चर्च हरेगाव,ऑल पास्टर्स फेलोशिप श्रीरामपूर,न्युज लाईफ पास्टरर्स व रेव्ह.फेलोशिप श्रीरामपूर, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ,महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद, मेथाडिस्ट चर्च,सेव्हन्थ डे चर्च ,सर्व्हेशन आर्मी,राष्ट्रीय ख्रिस्ती आघाडी,संत लूक हॉस्पिटल कानोसा हॉस्टेल,टिळक नगर सिस्टर श्रीरामपूर इ.चर्चचे धर्मगुरू व संघटना सहभागी झाल्या होत्या.याप्रसंगी विविध संघटनांनी एकत्र येऊन बॅनर पोस्टर्स घेऊन मुकमोर्चात सहभागी होते.लोयोला सदनचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.ज्यो.गायकवाड, रे.फा.संपत ओहोळ, रे.फा.टायटस,टिळकनगर येथील रे.फा.मायकल वाघमारे,रे.फा.संजय पठारे,संत तेरेजा हरेगाव येथील प्राचार्य रे.फा.डाॅमानिक रोझारिओ दिव्यवाणीचे रे.फा.अनिल चक्रनारायण, डि पाॅलचे धर्मगुरू रे.फा.थाॅमस, पा.राजेश कर्डक,मराठी मिशनच्या अध्यक्षा प्रा.डॉ विजया जाधव,सुधीर ओहोळ हेडमास्तर,पा.आण्णा अमोलीक,पा.सतिश आल्हाट,पा. विजय खाजेकर,पा.रावसाहेब त्रिभुवन,पा.सचिन चक्रनारायण,पा.पीटर बनकर,योसेफ खंडागळे,पा.सुभाष खरात,, पा.योगेश ठोकळ,पा.अशोक त्रिभुवन,बिशप अविनाश सोनवणे, सॅल्वहेशन आर्मीचे कॅप्टन बाळु निकाळजे,मेजर बबन बोर्डे,मेथाॅडीस्ट चर्चचे ॲड.ज्योस्ना कदम,सेंट जॉन बॅप्स्टीस्ट चर्चचे ॲड.आर डी भोसले,ॲड.प्रदीप सिंग व ऑल पास्टर फेलोशिप सर्व पाळक या मुकमोर्चामध्ये सहभागी झाले होते.