कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी साधला जनतेशी थेट संवाद
वर्धा जिल्हा प्रतिनिधी(सागर झोरे):-नवनियुक्त पोलीस अधीक्षकांनी शहरातील पोलीस स्टेशनच्या आवारात जिल्हा क्राईम मीटिंगचे आयोजन केले होते.यादरम्यान आज त्यांनी जनतेशी संवाद साधत जनतेच्या समस्याही जाणून घेतल्या.या आधी शहरातील जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करणार असल्याचे सांगितले. येत्या काही दिवसात शहरात ट्रॅफिक क्राईम ब्रांच लवकरच सुरू करणार असुन त्याचा उद्घाटन सोहळा काहि दिवसात होणार असल्याचे सांगितले,पोलीस दिदी पोलीस दादा असे पथक सुध्दा शहरात गुन्हेगारीवर वचक ठेवण्याकरिता लवकरात लवकर सुरू करणार असून,याचबरोबर चार्ली पथक सुध्दा सुरू करणार असल्याचे सांगीतले.अनेक नव नवीन उपक्रम जनतेच्या सुरक्षितेसाठी पोलिस विभागा कडुन राबविल्या जात असुन गुन्हेगारी संपविन्याचे दृष्टीने पोलिस विभागाचे प्रयत्न सुरु आहे.असे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.या वेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्ना वरती तात्काळ उत्तरे देऊन त्यांना समाधान केले.