नगर प्रतिनिधी (दि.१८ जानेवारी):-मोक्यातील एक वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगार स्वप्निल उर्फ सोप्या अशोक पाखरे (रा. नागरदेवळे ता.जि.अहमदनगर) याला पकडण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे.घटनेतील सविस्तर माहिती अशी की यातील आरोपी पाखरे हा दि.१७ जानेवारी रोजी नागरदेवळे परिसरात येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदार मार्फत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख यांना मिळाल्याने त्यांनी लागलीच एक पथक तयार करून तसेच तांत्रिक विश्लेषण करून आरोपी शोधण्याकरिता सापळा लावला असता नमूद गुण्यातील आरोपी हा नागरदेवळे परिसरात आढळून आला व त्याला पोलीस पथकाने जागीच अटक केली.स्वप्निल उर्फ सोप्या अशोक पाखरे हा सराईत आरोपी असून त्याच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन,कोतवाली पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन,संगमनेर शहर पोलीस स्टेशन,कोरेगाव पार्क पुणे रेल्वे पोलीस स्टेशन,पिंपरी पोलीस स्टेशन अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण 20 गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख,सफो/कैलास सोनार,पोहे/गणेश नागरगोजे,पोहेकॉ/गोविंद गोल्हार,पोहेकॉ/अजय नगरे,पोहेकॉ/बिबीशन दिवटे,पोना/गणेश साठे,पोना/राहुल द्वारके,पोना/बाबासाहेब गायकवाड,यांनी केली आहे.