Maharashtra247

पुणे सोलापूर महामार्गावर भरधाव स्कॉर्पिओ गाडी उलटल्याने मोठा अपघात सहा जण गंभीर

 

श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.19 जानेवारी):-डाळज क्र. 3 (ता. इंदापूर) पुणे सोलापूर महामार्गवर बुधवारी दि.18 जानेवारी 2023 रोजी पहाटे भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ गाडी उलटल्यामुळे मोठा अपघात झाला.ज्यात श्रीगोंद्यातील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर गाडी मुख्य रस्त्या सोडुन सेवा रस्त्यावर जाऊन उलटली. याबाबत महामार्ग पोलिसांनी माहिती सांगितली.स्कॉर्पिओ मोटार क्र. MH 16 VZ 6558 YA गाडीचा चालक मनोज कौठळे वय 21,रा. देवदैठण,ता.श्रीगोंदा, जि. नगर) हा सोलापूरच्या दिशेने भरधाव जात असताना पहाटे 5:00 वाजण्याच्या सुमारास डाळज क्र.3 गावच्या हद्दीत SCORPIO गाडी उलटली. या मोटारीतील विलास वंजारी (वय 50, रा.निंबवी,ता. श्रीगोंदा,जि.नगर),नाथा गुंजाळ (वय 62) बाळासाहेब गुंजाळ (वय 49),बाळासाहेब गायकवाड (वय 54), बाळू पवार, आर्या कवठळे (वय 14, सर्व रा. देवदैठण) हे या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहनातून बाहेर काढण्यात आले.जखमींना रुग्णवाहिकेतून भिगवणच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक धर्मपाल सांगळे यांनी सहकारी व NHAI च्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

You cannot copy content of this page