Maharashtra247

राहाता व कोपरगाव परिसरात अवैध गावठी हातभट्टी ठिकाणी एलसीबीचे छापे

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.१९ जानेवारी):-राहाता व कोपरगांव परिसरात अवैध गावठी हातभट्टी ठिकाणी छापे टाकुन ०३ आरोपीविरुध्द कारवाई करुन १,०६,०००/- रुपये (एक लाख सहा हजार रुपये) किमतीचे अवैध गावठी हातभट्टीची साधने व १९०० लि. कच्चे रसायन तसेच ११० लि.तयार दारुचा साठा स्थानिक गुन्हे शाखेने नाश केला आहे.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सहा.फौज/भाऊसाहेब काळे,बाळासाहेब मुळीक,पोहेकॉ विजयकुमार वेठेकर,पोना/शंकर चौधरी,लक्ष्मण खोकले,राहुल सोळुंके,पोकॉ/रणजित जाधव यांचे पथक तयार करुन राहाता पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी दिनांक १८/०१/२०२३ रोजी राहाता व कोपरगांव परिसरात मिळालेल्या माहितीवरुन खालील प्रमाणे वेगवेगळया ठिकाणी छापे टाकण्यात आले असून एकुण १,०६,०००/- रुपये किमतीचा मुद्येमाल त्यामध्ये १९०० लि.गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व ११० लि.गावठी हातभट्टीची दारू जप्त करुन त्यांचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये ०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सदरची कारवाई डॉ.श्री. बी.जी.शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र,नाशिक,श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्रीमती स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर,श्री.संजय सातव उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page