साकत मधून गावठी दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
अहिल्यानगर (दि.५ प्रतिनिधी):-आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अहिल्यानगर तालुक्यातील साकतमधून अवैध गावठी दारू वाहतूक करणारा ताब्यात घेतला आहे.त्याच्याकडून ७० लीटर गावठी दारू असा ९० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत महाराष्ट्र दारू बंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्तू महिपती पवार (वय ३६),रा.साकत,ता. जि.अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ठिक ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे.
अहिल्यानगर तालुक्यात साकत येथे अवैध दारू वाहतूक केली जात असल्याची माहिती उपअधीक्षक प्रविणकुमार तेली, निरीक्षक सुरज कुसळे यांना मिळाली.त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.ही कारवाई दुय्यम निरीक्षक एस.व्ही.शिंदे,विनोद रानमाळकर, जवान सुरज पवार,चतुर पाटोळे,देवदत्त कदरे, दीपक बर्डे व महिला जवान सुनंदा अकोलकर यांच्या पथकाने केली.