Maharashtra247

दारू पिताना मित्राशी झाले भांडणं गावठी कट्टयाने फायर करत मित्रालाच संपवले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना पकडले 

 

अहिल्यानगर (दि.७ प्रतिनिधी):-पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील तरूणाच्या डोक्यात गावठी कट्टयाने फायर करून केलेल्या खुनाच्या गुन्हयातील आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.पंकज राजेंद्र मगर,वय 35, रा.माधवनगर,तिसगाव, ता.पाथर्डी,इरशाद जब्बार शेख,वय 38, रा.सोमठाणे रोड, तिसगाव,ता.पाथर्डी,अमोल गोरक्ष गारूडकर, वय 33,रातिसगाव, ता.पाथर्डी असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

बातमीची हकीकत अशी की,प्रवरासंगम ता.नेवासा येथे एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह मिळून आला होता.मृतदेहाचे फोटो सोशल मिडीयावर प्रसारीत करून मृतदेहाची ओळख पटविली असता सदरचा मृतदेह हा कल्याण देविदास मरकड,रा.तिसगाव,ता.पाथर्डी याचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.मयत हा दि.01/नोव्हेंबर 2024 रोजी पासुन बेपत्ता असल्याने त्याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे मिसींग क्रमांक 129/2024 अन्वये मिसींग नोंदविण्यात आलेली होती.

प्रवरासंगम,ता.नेवासा येथे सापडलेला अनोळखी पुरूषाचा मृतदेह व पाथर्डी पोलीस स्टेशन येथील मिसींगमधील व्यक्ती एकच असल्याची पोलिसांची खात्री झाली होती.तपास पथकाने गुन्हयाचे तपासात तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन,सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आरोपीचा शोध घेत असताना दि. 06 नोव्हेंबर 2024 रोजी तपास पथकाने निवडुंगे,ता.पाथर्डी येथे संशयीत वरील इसमांचा शोध घेऊन ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता दि.01 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11.00 वा.सुमारास वर नमूद आरोपी व मयत कल्याण देविदास मरकड असे तिसगाव मधील मिरी रोडच्या भारत पेट्रोलपंपाच्या मागील बाजुस मोकळया जागेत दारू पित असताना मयत व पंकज मगर यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले.वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन पंकज मगर याने त्याचे कडील गावठी कट्टयाने कल्याण मरकड याचे कपाळावर गोळी मारली त्यात तो मयत झाला असल्याचे सांगीतले.त्यानंतर आरोपीतांनी मयताचा मृतदेह,चप्पल व मोबाईल पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने एका गोणीत भरून चारचाकी वाहनातुन प्रवरासंगम येथील ब्रीजवरून खाली पाण्यात टाकुन दिला.

तसेच आरोपी पंकज राजेंद्र मगर याने गुन्हयात वापरलेले अग्नीशस्त्र हे सचिन रणसिंग (रा.दत्ताचे शिंगवे ता.पाथर्डी) याने पुरविले असल्याची माहिती सांगीतली आहे.ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला अहिल्यानगर,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे श्रीरामपूर,श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार तपास पथकातील पोसई/ तुषार धाकराव व पोलीस अंमलदार सुरेश माळी,संदीप पवार, संतोष लोढे,शरद बुधवंत,संतोष खैरे, विशाल तनपुरे,प्रशांत राठोड,मेघराज कोल्हे, अर्जुन बडे,अरूण मोरे पोलीस यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page