आ.संग्राम जगताप पुन्हा तिसऱ्यांदा निवडून येणार तृतीयपंथी संघटनेचा जाहीर पाठिंबा
अहिल्यानगर (दि.७ प्रतिनिधी):-विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांची नगर विकास यात्रा पोहोचली.यावेळी परिसरातील नागरिकांच्या वतीने ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव आणि फटाक्याची आतिषबाजी करत आमदार संग्राम जगताप यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
या यात्रेला प्रभागातील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद भेटत असून आमदार संग्राम जगताप यांनी तारकपूर परिसरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये विविध विकास कामे केल्यामुळे आमदार संग्राम जगताप यांना पुन्हा तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून देणार असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.यावेळी तृतीयपंथी संघटनेच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यात आला. नगर विकास यात्रेसाठी मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.