संगमनेर (दत्तात्रय घोलप):-अहिल्या नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील साकूर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.
पाच दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत सोन्याच दूकान लूटून नेल्याची घटना सोमवार दि.११ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली आहे.
भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने साकूरमध्ये एकच खळबळ उडाली.सविस्तर माहिती अशी की,साकूर बसस्थानकजवळ निखील सुभाष लोळगे यांचं कान्हा ज्वेलर्स चे दूकान आहे.भरदिवसा पल्सर गाडीवर पाच दरोडेखोरांनी येऊन दूकानासमोर हवेत गोळीबार केला.तसेच थेट कान्हा ज्वेलर्सच्या दूकानात घुसून बंदूकीचा धाक दाखवत संपूर्ण सोन्याचा मालच लूटून नेला.पाचही दरोडेखोरांनी तोंडाला कापड बांधलेले होते.
या दरोडेखोरांनी गंठण, चैनी,मंगळसूत्र,वाट्या, कान चैनी,मिनी गंठण,टॉप्स,बाळ्या आदि सोन्याचं माल घेऊन फरार झाले आहे.ही घटना कळताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली आहे.घारगाव पोलिस घटनास्थळी धाव घेत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी मार्गस्थ झाले आहे.