नगर कॉलेजमध्ये शुल्लक कारणावरून राडा;कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ घेतली धाव
नगर प्रतिनिधी (दि.१९ जानेवारी):-दि.१५ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी नगर शहरात दगडफेक झालेली घटना ताजी असतांनाच आज गुरुवारी १९ जानेवारी रोजी पुन्हा नगर कॉलेज मध्ये दोन गट एकमेकाना भिडले.कोतवाली पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.या बाबत करण पाटील(रा.भिंगार) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून २० ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.परंतु अहमदनगर शहरांमध्ये वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये एक भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे व यातील टवाळखोरांवर प्रशासनाने वेळीच आळा घातला पाहिजे अशी नागरिकांमधून आता मागणी होत आहे.