चाकूने वार करून सोने घेऊन पसार झालेला व तब्बल सात गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी मुद्देमालासह श्रीगोंदा पोलीसांनी केला अटक
श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.२० जानेवारी):-बातमीतील हकीकत आशिकी दि.03 जानेवारी रोजी प्रशांत उत्तम शिपलकर (रा.तावरेवस्ती गार ता.श्रीगोंदा) यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की दिनांक 03/01/2023 रोजी कोणीतरी आज्ञात तीन चोरट्याने फिर्यादी यांचे राहते घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम व चांदीचे पैंजन चोरुन नेले आहे त्यावेळी फिर्यादी यांचे वडील यांना चाकु मारून दुखापत केली होती.पोलीस स्टेशनला गुरनं 05/2023 भा.द.वि.क.394.34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचे तपासात श्री.रामराव ढिकले पोलीस निरीक्षक यांनी दाखल गुन्ह्याचे अनुशंधाने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना येथील वड्या वस्त्या चेक करण्यास सांगीतले होते.दिनांक 14/01/2023 रोजी तळवडी ता.कर्जत येथे कोंबींग करुन रेकॉर्डवरील गुन्हेगार आकर्शन नवनाथ पवार (रा.खडकी जिल्हा पुणे) यास ताब्यात घेतले होते त्याचेकडे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्याने त्याचे दोन साथीदारांसोबत जबरी चोरी व घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली.आरोपीकडुन गुन्ह्यात चोरलेले 3500 रु. व 20000/-रु.किं.चे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण असा एकूण 22500/-रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.आरोपीकडुन खालील नमुद दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
1) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हारजिनं 5/2023 भा.द.वि.कलम 394,
2) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 4 /2023 भा.द.वि. कलम 457,380
अटक केलेल्या आरोपीवर दरोडा व जबरी चोरीचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1) श्रीगोंदा पोलास स्टेशन गुन्हारजिनं 317/2018 भादवीकलम 399,402
2) करमाळा पोलास स्टेशन गुन्हारजिनं 694/2022 भादवी कलम 395,323,504,506
(3) करमाळा पोलास स्टेशन गुन्हा रजि नं 547/2019 भादवी कलम 399,402
4) करमाळा पोलास स्टेशन गुन्हा रजि नं 296/2022 भादवी कलम 395,323,504
5) यवत पोलास स्टेशन गुन्हा रजि नं 221/2014 भादवी कलम 302,394,397,201,402
आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असुन आरोपीकडुन आणखी गंभीर गुन्हे उगडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्हाचा तपास पो.स.ई.समिर अभंग व पो.ना/गाडे करत आहेत.सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधिक्षक,प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधिक्षक, आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,पो.स.ई.समिर अभंग,सफौ/ ढवळे,पोना/इंगवले,पोकॉ/अमोल कोतकर,पोकॉ/ देवकाते,पोकॉ/साने,पोकॉ/रविंद्र जाधव यांनी केली आहे.