जिल्ह्यातील मयत पोलीस अंमलदारांच्या वारसांना अहमदनगर जिल्हा पोलीस को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२० जानेवारी):-कर्तव्यावर मृत झालेल्या सात पोलीस अंमलदारांच्या वारसांना अहमदनगर जिल्हा पोलीस को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने प्रत्येकी एक लाख रूपये मदतीचा धनादेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र सुद्रिक,संचालक लक्ष्मण खोकले,सचिव संजय चोरडिया,लिपीक प्रकाश पाठक यांच्यासह पोलीस अंमलदार उपस्थित होते.अलिकडच्या काळात पोलीस अंमलदारांवर कामाचा ताण वाढला आहे.ते कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना नगर जिल्ह्यात घडल्या आहेत.जिल्हा पोलीस दलातील सात अंमलदारांचा असाच मृत्यू झाला आहे.त्यांच्या वारसांना अहमदनगर जिल्हा पोलीस को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सभासद कल्याण निधीतून मदत केली जाते.प्रत्येक मयत अंमलदारांच्या वारसांना एक लाख रूपयांचा धनादेश दिला जातो.गुरूवारी दि.१९ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते हा मदतीचा धनादेश सात मयत अंमलदारांच्या वारसांना देण्यात आला.यावेळी मयताचे वारसदार माया संजय कदम,किर्ती सुनील मोरे,विक्रम विठ्ठल केदारे,राणी नामदेव सानप,लताबाई राधाकृष्ण साबळे,रेखा गोकुळचंद परदेशी,रंजना भाऊसाहेब आघाव यांच्याकडे धनादेश सुर्पूत करण्यात आले.