Maharashtra247

शांतिदूत सेवा संस्था प्रणित भायखळा खाद्य महोत्सव संपन्न टायगर ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची विशेष उपस्थिती

 

मुंबई प्रतिनिधी/प्रियंका गजरे (दि.२० जानेवारी):-भायखळा येथे दि.१९ जानेवारी रोजी शांतिदूत सेवा संस्था प्रणित भायखळा खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गोल्डन मॅन संदेश दादा पवार अध्यक्ष टायगर ग्रुप लालबाग परळ उपस्थित होते.सुमित भाऊ मोरे अध्यक्ष टायगर ग्रुप बांद्रा,मनोहर भाऊ शिंदे,अक्षय भाऊ खोत,कार्तिक भाऊ नायडू व निखिल भाऊ कटारनवरे व टायगर ग्रुप चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी टायगर ग्रुपचे लालबाग परळचे अध्यक्ष संदेश दादा पवार म्हणाले की सदरील कार्यक्रम हा समाज उपयोगी आहे व तसेच तसेच इथून पुढे हा कार्यक्रम कायम राबवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच आमची टायगर ग्रुप जी संघटना आहे ही समाजासाठी अहोरात्र झटत आहे.व अडीअडचणीत असलेल्या नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी चौवीस तास सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील असे या कार्यक्रमाप्रसंगी पवार यांनी आवर्जून सांगितले.

You cannot copy content of this page