Maharashtra247

तीन गावठी कट्टे व नऊ काडतूस अवैधरीत्या जवळ बाळगणारा तारकपूर बस स्टॅन्ड येथे एलसीबी कडून जेरबंद

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२० जानेवारी):-अहमदनगर शहरातील तारकपुर बस स्टॅण्ड येथे विक्री करण्याचे उद्देशाने तीन (03) गावठी कट्टे व नऊ (09) जिवंत काडतुस अवैधरित्या कब्जात बाळगणारा आरोपी 94,600/- रु. (चौ-यानव हजार सहाशे) रुपये किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे.श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक,अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, तारकपुर बस स्टॅण्ड येथील मोटार सायकल पार्किंग जवळ एक इसम गावठी कट्टे व जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी येणार आहेत आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई/सोपान गोरे,सफौ/राजेंद्र वाघ,संजय खंडागळे,पोहेकॉ/देवेंद्र शेलार, सुरेश माळी,संदीप घोडके,पोना/शंकर चौधरी,विशाल दळवी,रवि सोनटक्के,पोकॉ/सागर ससाणे,मच्छिंद्र बर्डे, रविंद्र घुंगासे,मयुर गायकवाड व चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर अशांनी मिळून वेशांतर करुन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने तारकपुर बस स्टॅण्ड येथे जावुन मोटार सायकल पार्किंग जवळ सापळा लावुन थांबलेले असतांना एक निळेरंगाचा चेक्स शर्ट व जिन्स पॅन्ट घातलेला व एक काळे रंगाची सॅक असलेला बातमीतील वर्णना प्रमाणे संशयीत इसम दिसला पथकाची खात्री होताच संशयीत इसमास ताब्यात घेण्याचे तयारीत असताना तो पळुन जावु लागला लागलीच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी संशयीताचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले व पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)मुकेश रेवसिंग खोटे ऊर्फ बरेला,वय 31,रा.खुरमाबाद,ता.सेंदवा, जिल्हा बडवाणी,राज्य मध्यप्रदेश असे असल्याचे सांगीतले.त्याची अंगझडती घेता अंगझडतीत एक काळे रंगाचे सॅकमध्ये तीन (03) गावठी बनावटीचे कट्टे व नऊ (09) जिवंत काडतूस मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील इसमाकडे गावठीकट्टे व काडतुसा बाबत विचारपुस करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला.त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईन तपास करता त्याने सदर गावठीकट्टे व जिवंत काडतुस हे मध्यप्रदेश येथुन विक्री करीता आणल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपीकडे तीन (03) गावठी कट्टे, नऊ (09) जिवंत काडतूस व एक काळे रंगाची सॅक असा एकुण 94,600/- रु.किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर बाबत सफौ/राजेंद्र देवमन वाघ ने. स्थागुशा,अहमदनगर यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे आर्म ऍ़क्ट 3/25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व पुढील कायदेशिर कार्यवाही तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page