नगर प्रतिनिधी (दि.२० जानेवारी):-मकर संक्रांतीनिमित्त आर्ट ऑफ लिविंग तर्फे महिलांसाठी सामूहिक हळदीकुंकू समारंभ व मोफत रक्त तपासणी शिबिर गुरुवार दि.२६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ८ वाजता आर्ट ऑफ लिविंग ज्ञानक्षेत्र गावडे मळा पाईपलाईनरोड अहमदनगर येथे आयोजित केलेला आहे तरी शहरातील व तसेच परिसरातील महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.विशेष सामूहिक हळदी कुंकु जसे प्रत्येक स्त्री आपल्या दिर्घ सौभाग्याची प्रार्थना देवाकडे करते,पतीला निरोगी आरोग्य आणि दिर्घ आनंदी आयुष्य मागत असते.प्रत्येक सौभाग्याचा सण श्रद्धेने साजरा करते.पण प्रत्येक स्त्रीयांचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी,तिच्या दिर्घायुष्यासाठी,आनंदासाठी विचार करणे तेवढेच महत्त्वाचे आहे.कारण ती कुटुंबाची मध्य बिंदू आहे,एक उर्जा स्त्रोत आहे,तीच्या दिर्घ आयुष्यासाठी,निरोगी आरोग्यासाठी अहमदनगर आर्ट ऑफ लिव्हिंग घेऊन आला आहे.महिला स्पेशल मोफत आरोग्य,आणि रक्ततपासणी शिबिर व संक्रांती स्पेशल विशेष सामुहिक हळदीकुंकू कार्यक्रम तरी सर्व महिलांनी ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावे.आणि खालील Group ला join करावे.👇
https://chat.whatsapp.com/KpTqA2GmIs9BB5HSgCxoTg
