अहमदनगर प्रतिनिधी (दि.२० जानेवारी):-अहमदनगर शहरातील व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था भंग करुन व्यक्तिगत भांडणांना जातीयवादी वळण दिले जात असून हे षडयंत्र करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले.यावेळी हाजी.शौकत तांबोळी, हाजी.सय्यद वहाब, हाजी.नजीर हुसेन,शफी जहागीरदार,सलाम खोकर, साहेबान जहागीरदार,अजीम राजे,नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान,मुजाहिद कुरेशी,दिशान जहागीरदार, राजू जहागीरदार,शेख मुदस्सर अहमद,फिरोज सय्यद,अजर शेख आदीसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शहरात घडत असलेल्या घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असुन बाहेरून काही मंडळी शहरातील जिल्ह्यातील तरुणांचे माथे भडकवण्याचे प्रयत्न करीत आहे. तरुणांच्या भावना भडकवीत असून काही मंडळींना शहरातील शांतता देखत नसल्यामुळे बाहेरून काही मंडळींना निमंत्रित करून मोर्चे सभा आंदोलने असे विविध भडकवणारे कार्यक्रम आयोजित करत असून शहराचे वातावरण दूषित करण्याचे आयोजन होत असताना त्याचे परिणाम काय होणार हे प्रशासनाला माहित आहे.त्याबाबत योग्य ती दक्षता प्रशासनाने घेऊन शहरातून शांतता अबाधित राहण्यासाठी याबाबत प्रयत्न करणे फार आवश्यक असुन अशा प्रकारच्या घटना घडवून आणणारे किंवा त्याबाबत षडयंत्र रचणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावे मग ती कुठल्याही समाजाची असो अशी मागणी केली आहे.व प्रशासनाने विविध समाजातील प्रतिष्ठित नागरिक,सामाजिक, राजकीय,कार्यकर्ते,नेते,व्यापारी वर्ग यांची शांतता समितीची संयुक्त बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेणे फार आवश्यक असून शहरात शांतता अबाधित राहावी यासाठी शांतता मीटिंग घेण्यात यावी व अशा प्रकारचे घटना शहरात घडल्यास त्याचा तोटा सामान्य नागरिक व्यापारी वर्ग यांना भोगाव लागत असून तरी लवकरात लवकर शहरातील शांतता व सुव्यवस्था भंग होणार नाही याची दखल घेऊन याबाबत योग्यती कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देउन करण्यात आली आहे.

