निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून सुट्टी देण्यात याव्यात-आम आदमी पार्टी पुणे शहर शिक्षक आघाडी अध्यक्ष शितल कांडेलकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
पुणे प्रतिनिधी:-येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कर्तव्यावर नेमलेले आहे.
त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या दिवशी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी पुणे शहर शिक्षक आघाडीच्या अध्यक्षा शीतल कांडेलकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना मागणी केली आहे.दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक त्यांचा स्वतःचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघात त्यांची नेमणूक केली जाते.मतदानाची संपण्याचा कालावधी सायंकाळी ६ वा.पर्यंत असतो.त्यानंतरही ही संपूर्ण प्रक्रिया पार पडण्यासाठी म्हणजेच मतदान केंद्रावर दोन ते तीन तासाचा कालावधी लागतो.त्यानंतर मतदान यंत्राच्या पेट्या व साहित्य हे गाडी आणल्यानंतर तालुक्यात आणणे,साहित्य तपासून जमा करणे या प्रक्रियेला मोठा कालावधी लागतो. ही सर्व कामे तिथे नियुक्त केलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जबाबदारीने पार पाडतात.ही सर्व प्रक्रिया संपल्याने हे शिक्षक व कर्मचारी यांना आपापल्या तालुक्यात परतण्यासाठी सकाळ होते.
आणि सकाळी आल्यानंतर पुन्हा शाळेत किंवा आपल्या कार्यालयात पोहोचणे शक्य होत नाही.तसेच या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी व रात्रभर प्रवास याने कर्मचाऱ्यांवर ताणही आलेला असतो व ते थकूनही जातात.त्यांच्या पुन्हा कार्यालयातील कामे अथवा ज्ञानार्जन करणे यासाठी मानसिकता नसते म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अवस्थेला लक्षात घेऊन मानवता धर्म लक्षात घेऊन निवडणुकीत नेमण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी देण्यात यावी व निवडणुकीसाठी आपल्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतल्यास लोकशाहीचा उत्सव आणखी उत्साहात पार पडेल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.