Maharashtra247

जिल्ह्यात मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी आलेल्या बाहेरील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवर निर्बंध;जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास तात्काळ कारवाई होणार

 

अहिल्यानगर (दि.१८ प्रतिनिधी):-विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया शांततेत,निर्भयपणे आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी प्रचार कालावधी संपल्यानंतर बाहेरील मतदारसंघातील राजकीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवर निर्बंध घालणारे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जारी केले आहेत.

प्रचार संपल्यानंतर मतदारसंघात कोणताही प्रचार होऊ नये यासाठी मतदारसंघाचे मतदार नसलेल्या आणि मतदारसंघाच्या बाहेरून आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना त्या मतदारसंघात उपस्थित राहता येणार नाही. बाहेरील कार्यकर्त्यांची सतत उपस्थिती मुक्त व निष्पक्ष मतदानावर परिणाम करू शकते,त्यामुळे प्रचार संपताच बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघ सोडणे बंधनकारक असणार आहे.यासाठी मंगल कार्यालये, अतिथीगृहे,निवासीगृहे आदी ठिकाणी तपासणी करून बाहेरील लोकांची नोंद ठेवली जाईल.

मतदारसंघाच्या सीमांवर तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी आणि ओळखपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांचे हे आदेश १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते २५ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात असणार आहेत.या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page