अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्यां विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ५ जणांवर गुन्हे दाखल
अहिल्यानगर प्रतिनिधी:-विधानसभा निवडणुक आदर्श आचारसंहीता 2024 च्या अनुषंगाने दि.18 नोव्हेंबर 2024 रोजी अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या इसमान विरोधात विरोधात राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक क्र.1 अहिल्यानगर विभागाने धडक कारवाई कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अहिल्यानगर अधीक्षक श्री.प्रमोद सोनोने व श्री.प्रविणकुमार तेली, उपअधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक क्र.1 यांनी दि.18 नोव्हेंबर 2024 रोजी अवैध ठिकाणी मद्यसेवन करताना एकुण 1 गुन्हा नोंद केला असून सदर गुन्ह्यात हॉटेल प्रिन्स च्या मालकासह एकूण 5 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करून येथे गुन्हा दाखल केला.सदर कारवाईत श्री.एस.आर.कुसळे निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक क्र.1, दु.नि.श्री.आ. जावळे,श्री.व्ही.एन. रानमाळकर,सहा.दु.नि., जवान सर्वश्री.सुरज पवार,चतुर पाटोळे, देवदत्त कदरे,सिद्धांत गिरीगोसावी,सुनंदा अकोलकर महिला जवान हे सहभागी झाले होते.
तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जनतेस आवाहन करण्यात येते की,अवैध मद्य निर्मिती,वाहतुक व विक्री संदर्भात कोणतेही माहिती अथवा तक्रार असल्यास 1800 2339 999 व व्हाटस ॲप क्र.8422001133 या क्रमांकावर संपर्क साधवा.