पिपल्स रिपब्लिकन पार्टिच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा;संविधानामुळे प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळाला तालुकाध्यक्ष संतोष मोकळ
श्रीरामपूर (प्रतिनिधी):-२६ नोव्हेंबर १९४९ हा तो दिवस आहे जेव्हा आपल्या देशाची राज्यघटना तयार झाली.देशातील नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा उद्देश आहे.भारतातील विविध धर्म, जाती आणि करोडो लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे.तिचा गौरव करण्यासाठी आपण हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा करतो.
आज संविधानामुळे खऱ्या अर्थाने सर्व सामान्य नागरिकांना जगण्याचा अधिकार मिळाला.त्यामुळेच माझ्या सारख्या सर्वसामान्यांला माणसाला तालुक्याचा आमदार होण्याचा मान मिळाला असे प्रतिपादन मा.आ.भाऊसाहेब कांबळे यांनी केले.श्रीरामपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.यावेळी श्रीरामपूरचे लोकप्रिय माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,माजी नगरसेवक अनिल रनदिवे,रिपब्लिकन चळवळींचे नेते महेद्र त्रिभूवन पीआरपीचे शहर अध्यक्ष रमजान शेख,संजय त्रिभूवन,अरुण वाघमारे,देवमान लोखंडे,दशरथ भोंगळे सर,पंडित पगारे,गायकवाड सर,अशोक दिवे,कचरू साबळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलताना पिपल्स रिपब्लिकन पार्टिचे संतोष मोकळ म्हणाले की आपल्या देशाचे सर्व कायदे या राज्यघटनेने बनवलेले आहेत. सर्वोच्च न्यायालय,उच्च न्यायालय,संसद,राज्य विधिमंडळ,पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यासह देशातील सर्व न्यायालये या अंतर्गत काम करतात.या अंतर्गत आपल्या सर्वांना हक्क प्राप्त होतात जेणेकरून आपण संपूर्ण स्वातंत्र्य आणि समानतेने जीवन जगू शकू. संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपले हक्क बहाल करत असले तरी त्यात दिलेली मुलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात.हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की २६ नोव्हेंबर हा दिवस देशात राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही साजरा केला जातो.तसेच संविधानामुळे प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळाला असे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष मोकळ म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्तविक गायकवाड सर यांनी केले तर भारताचे संविधान प्रास्तविकाचे वाचन संतोष मोकळ यांनी केले .