रात्रीच्या वेळी घरात घुसुन दागिने चोरी करणारा आरोपी जेरबंद कोतवाली पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर प्रतिनिधी:-रात्रीचे वेळी घरात घुसुन दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस कोतवाली पोलीसांनी जेरबंद करत त्याच्याकडून सुमारे दीड लाखाचा ऐवज जप्त करण्यात यश आले आहे.
दि.०९ नोव्हेंबर २०२४ रोजी काजल आकाश पंधारे (वय २५ वर्षे रा.पोखर्डी) यांनी फिर्याद दिली की,तीचे माहेरी (इंगळे वस्ती अ.नगर) येथे आली असता रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे आत प्रवेश करून त्यांचे पर्स मधुन सोन्याचे मंगळसुत्र चोरुन घेवून गेला आहे. वगैरे मजकुरच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोस्टे गु.र.नं. ११९५/२०२४ बी.एन.एस २०२३ चे कलम ३०५(अ) प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास व आरोपीचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,सदर गुन्ह्यातील आरोपी हा रेल्वेस्टेशन परिसरात चोरीतील दागीने विक्री करण्याकरिता आलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने रेल्वेस्टेशन परिसरात गुन्हे शोध पथकासह सापळा लावुन संशयित इसमास ताब्यात घेवून त्याचे कडे विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव संजय ज्ञानदेव धिवर (वय.२९ वर्षे रा.इंगळे वस्ती रेल्वे स्टेशन अहिल्यानगर) असे सांगुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे घरातून चोरी केलेले दागिने मिळून आले.तरी सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ.शरद वाघ हे करत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक.प्रताप दराडे, सपोनि.योगीता कोकाटे, सफौ.सुनील भिंगारदिवे पोहेकॉ.योगेश भिंगारदिवे,विशाल दळवी,सलिम शेख, विक्रम वाघमारे,राजेंद्र पालवे,पोकॉ.अभय कदम,अमोल गाडे,सतिष शिंदे,अतुल काजळे,दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे.