हिवरगाव पावसा येथे संविधान दिन उत्साहात साजरा
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा ग्रामपंचायतच्या वतीने संविधान दिनाच्या कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते.
देशाने संविधान स्वीकारल्याचे 75 वर्ष पूर्ण झाले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी हिवरगाव पावसा गावचे सरपंच सुभाष गडाख,भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,ग्रामसेवक हरीश कुमार गडाख, कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,बच्चन भालेराव,अंजना भालेराव, बाबासाहेब भालेराव,चंद्रकांत भालेराव प्रवीण गडाख, गोकुळ गडाख, धनंजय पावसे, मधुकर बोऱ्हाडे, सचिन आरगडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.ग्रामसेवक हरीश कुमार गडाख यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले.या कार्यक्रमासाठी हिवरगाव पावसा गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.