खून झाला ओ साहेब..! मृतदेह पोत्यात नेताना मी पाहिले ११२ नंबरवर खोटा कॉल करणे भोवले गुन्हा दाखल
अहमदनगर प्रतिनिधी:-अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात हनुमाननगर गेट जवळ माझ्या भावाचा खून झाला आहे.त्याचा मृतदेह पोत्यात घालून नेताना मी पाहिले आहे,त्याचा शोध घ्या,त्याचा तपास लागत नाही अशी खोटी माहिती डायल ११२ नंबरवर देणाऱ्या विरूद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोटा कॉल करणारा परशराम रावसाहेब दिवे (वय ३१, रा. हनुमाननगर, कोपरगाव) असल्याचे तपासात निष्पन्न झाले.कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात परशराम दिवे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.