पारेवाडी मध्ये डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय विळदघाटच्या कृषी कन्यांचे ग्रामस्थांनी केले स्वागत..
नगर (प्रतिनिधी):-महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय विळदघाट,अहिल्यानगरच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नगर तालुक्यातील पारेवाडी येथे दाखल झाल्या.
यावेळी त्यांचे स्वागत पारेवाडीचे लोकनियुक्त सरपंच राहुल शिंदे, ग्रामविकास अधिकारी आदिनाथ बोरुडे, सोबतच प्रशांत गुंड, जालिंदर शिंदे, प्रभाकर शिंदे, सुनील शिंदे, शुभम गुंड, साहेबराव गुंड आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. कृषी कन्या मेघा वाघ, मृणाल साळवे, नमिता शेळके, वैष्णवी कोलते या दहा आठवडे पारेवाडी मध्ये कार्यरत राहणार असून प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन प्रथम सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, गावातील पीक पद्धती, माती व पाणी परीक्षण, विविध पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन, हवामान सल्ला, बाजारभाव, आधुनिक तंत्रज्ञान व कृषी औद्यागिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेवटच्या चार आठवड्यांमध्ये कृषी आधारीत व्यवसाय किंवा उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतील.
कृषी कन्यांना कृषी महाविद्यालय विळदघाटचे प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे, उपप्राचार्य डॉ. एस. बी. राऊत, प्रा. के. एस. दांगडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. व्ही. रोंगे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अशी माहिती गावचे सरपंच श्री. राहुल शिंदे यांनी दिली.