अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शेवगाव येथे ४ लाखांची सुगंधी तंबाखू जप्त करून पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करत ३ आरोपींना घेतले आहे.शेवगाव येथे अवैधरित्या विकत घेऊन विक्रीसाठी ठेवलेला एक लाख ४ हजार ४२० रुपये किमतीचा विविध कंपनीचा सुगंधी पानमसाला- तंबाखू व गुटखा शेवगाव शहरातील खालची वेस येथे पकडला आहे.
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार (ता.६) दुपारी ही कारवाई केली.याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी अशोक ढाकणे यांच्या फिर्यादीवरून बिलाल मोहंमद हनिफ तांबोळी (वय ३४), अरबाज मोहंमद रफीक तांबोळी (वय २२), अजीम फारूक तांबोळी (वय ४१), (सर्व राहणार खालची वेस, काझी गल्ली, शेवगाव), अख्तर महेबूब आंबेकर (रा. ता. पैठण), दादासाहेब अंकुश जाधव, आदिनाथ अंकुश जाधव (दोघे, रा. ता. गेवराई) या सहा जणांविरोधात अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यातआला आहे. तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार,पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष लोंढे,पोलिस कॉन्स्टेबल किशोर शिरसाठ, पोलिस कॉन्स्टेबल आदिनाथ शिरसाठ, तसेच शेवगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस कॉन्स्टेबल गीतांजली पाथरकर यांनी पंचासमक्ष शहरातील खालची वेस येथे राहणारे बिलाल, अरबाज व अजीम तांबोळी यांच्या घराची झडती घेतली असता तेथे १ लाख ४ हजार ४२० रुपयांचे विविध कंपन्यांचे ५७६ सुगंधी पानमसाला तंबाखू व गुटखा पुढे आढळून आले.त्यांच्या कडे विचारपूस केली असता सर्व पानमसाला अख्तर आंबेकर,दादासाहेब जाधव,आदिनाथ जाधव यांच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे सांगितले अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदरची कारवाई ही राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली सुगंधी पानमसाला तंबाखू व गुटखा विकत घेऊन विक्रीसाठी ठेवल्या प्रकरणी सहा जणांविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.