डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने रीपाईच्या वतीने सोनईत अभिवादन
सोनई प्रतिनिधी:-सोनई येथे महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर आभिवादन करण्यात आले.
सोनई येथे बाबासाहेब आंबेडकरांना सोनई परिसरातील सर्व धर्म नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे जिल्हाअध्यक्ष व महाराष्ट्र शासनाचे समाज कल्याण विभागामार्फत दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त विजुभाऊ जगताप हे होते.
यावेळी सोनई पोलीस स्टेशनचे एपीआय विजय माळी,पीएसआय सुरज मेढे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण अर्पण केले याप्रसंगी सोनई गावचे ग्रामपंचायत सदस्य जमशेद सय्यद,भानुदास कुसळकर,किशोर वैरागर,संतोष साळवे, नजीर सय्यद आदी उपस्थित होते.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश काकडे,सागर वैरागर,रोहित वैरागर, सचिन वैरागर,कलीम पठाण,शाबुद्दीन शेख, राजू वैरागर यांनी परिश्रम घेतले.