अहिल्यानगर प्रतिनिधी:-झेंडीगेट,अहिल्यानगर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कत्तलखान्यावर छापा टाकुन 8 लाख 10,000/-रू.किं. मुद्देमाल जप्त करून 3 आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. नमुद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप पवार, पंकज व्यवहारे,विजय ठोंबरे,संतोष खैरे,रविंद्र घुंगासे,शिवाजी ढाकणे,आकाश काळे,अशांचे पथक तयार करुन अहिल्यानगर शहरामध्ये अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.
अहिल्यानगर शहरामध्ये अवैध धंदयाची माहिती घेत असताना,पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फैजान इद्रिस कुरेशी व इतर इसमांनी बाबा बंगाली चौकी जवळील सरकारी शौचालयाचे शेजारी एका पत्र्याचे शेडमध्ये गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्यासाठी डांबुन ठेवलेले आहेत,अशी माहिती मिळाली.तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष नमूद ठिकाणी खात्री करण्याकरीता जात असताना 3 इसम पळून गेले.पथकाने पंचासमक्ष घटनाठिकाणी पत्र्याचे शेडमध्ये पाहणी केली असता शेडमध्ये गोवंश जातीची जिवंत जनावरे निर्दयतेने बांधुन ठेवलेली मिळून आली.आसपासचे नागरिकांना विचारपूस करून पळून गेलेल्या इसमांचे नाव विचारले असता त्यांची नावे फैजान इद्रिस कुरेशी, सुफियान उर्फ गुल्लु इद्रिस कुरेशी,शोएब अब्दुलरऊफ कुरेशी (सर्व रा.झेंडीगेट, अहिल्यानगर) असे असल्याचे सांगीतले.घटना ठिकाणावरून 8 लाख 10,000/-रू किंमतीच्या 15 गायी,3 लहान गोवंशीय गोऱ्हे असे एकुण 18 जिवंत गोवंशी जनावरे मिळून आल्याने ताब्यात घेण्यात आले.
वर नमूद 03 फरार आरोपी विरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 1302/2024 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (अ) (ब) (क) 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.