अहील्यानगर प्रतिनिधी:-पाथर्डी व शेवगाव तालुक्यात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत त्यांच्याकडून 2 लाख 17,000/-रू.किं. मुद्देमाल हस्तगत केला आहे.सदरील आरोपीकडून 9 घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहे.
बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी सौ.सुमन बाबुराव पालवे, रा.घाटशिरस,ता.पाथर्डी या दि.25/11/2024 रोजी त्याचे कुटुंबियासह लग्नाकरीता बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरटयांनी त्यांचे घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागीने चोरून नेले.याबाबत पाथर्डी पो.स्टे.येथे गुरनं 1132/2024 भा.न्या.सं. 2023 चे कलम 331 (3),305 (अ) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने घरफोडीचे गुन्हे होत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना ना उघड घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/हेमंत थोरात,पोसई/ अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बबन मखरे, हृदय घोडके,फुरकान शेख,शरद बुधवंत, संतोष खैरे,भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर, मेघराज कोल्हे व अरूण मोरे अशांचे पथक नेमुन घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणणेबाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
तपास पथक वरील गुन्हयांतील गेला माल व आरोपीचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत असताना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा हा विनोद उर्फ सुप्या सक्या भोसले, रा.निपाणी जळगाव, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर व त्याचे साथीदारांनी केलेला असून ते सध्या पाथर्डी शहरामध्ये आहेत.पथकाने मिळालेल्या बातमीतील ठिकाणी जाऊन संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव विनोद उर्फ सुप्या सक्या भोसले,वय 25, रा.निपाणी जळगाव, ता.पाथर्डी, जि. अहिल्यानगर,सचिन भाऊसाहेब काळे,वय 21,रा.लखमापुरी, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर असे सांगीतले.
तपास पथकाने वरील आरोपीतांना विश्वासात घेऊन,गुन्हयांबाबत विचारपुस केली असता आरोपीतांनी सदरचा गुन्हा हा विकास विठ्ठल भोसले,रा.उमापूर, ता.गेवराई, जि.बीड (फरार) याचे मदतीने केला असल्याची माहिती सांगीतली.तसेच गुन्हयातील चोरलेले काही सोन्याचे दागीने हे लक्ष्मीकांत सांडुशेठ मुंडलिक,रा.सोनार गल्ली,बिडकीन, ता.पैठण, जि.छ.संभाजीनगर यास विकल्याचे सांगीतल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांनी त्यांचा साथीदार विकास विठ्ठल भोसले यांचेसह मागील दोन तीन महिन्यात पाथर्डी व शेवगाव तालुक्यात वेगवेगळया घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे दिलेल्या माहितीवरून, पाथर्डी व शेवगाव पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील घरफोडीचे खालीलप्रमाणे 09 गुन्हे उघडकिस आणले आहेत.अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम 1 पाथर्डी 1132/2024 बीएनएस 331(3), 305 (अ)
2 शेवगाव 951/2024 बीएनएस 331(3), 305 (अ) 3 पाथर्डी 1060/2024 बीएनएस 331(3), 305 (अ)
4 पाथर्डी 1021/2024 बीएनएस 331(3), 305 (अ) 5 शेवगाव 931/2024 बीएनएस 331(3), 305 (अ)
6 शेवगाव 900/2024 बीएनएस 331(3), 305 (अ)
7 शेवगाव 816/2024 बीएनएस 331(3), 305 (अ)
8 पाथर्डी 890/2024 बीएनएस 331(3), 305 (अ)
9 पाथर्डी 922/2024 बीएनएस 331(3), 305 (अ) पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी विकास सक्या भोसले याचेकडे गुन्हयातील गेला मालाबाबत चौकशी केलीअसता त्याने काही मुद्देमाल सोनारास विकला व काही मुद्देमाल लपवून ठेवल्याचे सांगीतले.तसेच त्याने पंचासमक्ष लपवून ठेवलेले सोन्याचे दागीने त्यात 70,000/-रू किं.त्या 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा सर, 35,000/- रू.किं.5 ग्रॅम सोन्याचे कानातील झुंबर, 35,000/- रू किं. 5 ग्रॅम वजनाची सोन्याची पिळयाची अंगठी, 7,000/- रू कि.1 ग्रॅम वजनाचा सोन्याचा ओम व 70,000/- रू किं.10 ग्रॅम वजनाचे सोन्याची मिनीगंठण असा एकुण 2,17,000/- रू किंमतीचे 31 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने काढुन दिल्याने ते जप्त करण्यात आले.आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी पाथर्डी पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे,अपर पोलीस अधिक्षक,श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.