अहिल्यानगर प्रतिनिधी:-कत्तलीकरीता आणलेल्या एकुन 22 गोवंश जातीच्या जनावरांची कोतवाली पोलीसांनी सुटका करत मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त केले आहे.
दि.15 डिसेंबर 2024 रोजी पहाटे व सकाळी झेंडीगेट परिसरात गोवंश जातीच्या जनावरांती कत्तल चालु असल्याचे तसेच काही गोवंशीय जनावरे कत्तली करिता दाटीवाटीने बांधुन ठेवले असल्याबाबत दोन वेगवेगळ्या ठिकाणाची माहीती पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांना प्राप्त झाली. त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि. योगिता कोकाटे व रात्रगस्त अधिकारी स.पो.नि.विकास काळे यांना पोलीस स्टाफ व पंचासह बातमीतील नमुद ठिकाणी जावुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले.झेंडीगेट परिसरात बाबा बंगाली गल्ली,कुरेशी मोहल्ला व सैदु कारंजा मस्जीद जवळ अशा दोन ठिकाणी अनुक्रमे पहाटे 05.00 वा सकाळी 07.30 वा. छापा टाकुन कारवाई केली. पोलीसांनी पंचासमक्ष दोन्ही कारवाईत अंदाजे 100 किलो गोमांस,दोन लोखंडी सत्तुर व 22 लहान मोठी गोवंश जातीची जनावरे असा एकुन 6 लाख 50,200/- रु किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन ताब्यात घेतला.
आरोपी शोएब गुलाम शब्बर कुरेशी,वय 29 वर्षे,रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट,अहिल्यानगर व वसीम कदीर कुरेशी,वय 32 वर्षे,रा.तालीम मागे, सैदू कारंजा,झेंडीगेट, अहिल्यानगर यांचे विरुध्द सरकारतर्फे अनुक्रमे कोतवाली पोलीस स्टेशनला 1) गु.र.नं. 1318/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5 (अ), 5 (क), 9, 9 (अ), सह प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 119 प्रमाणे, 2) गु.र.नं. 1319/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5 (अ), 9, सह प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 119 प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि.योगिता कोकाटे,स.पो.नि. विकास काळे.स.फौ. अशोक सरोदे,पोहेकॉ. संदिप पितळे, म.पो.हे.कॉ.रोहीणी दरंदले,पोकॉ.दिपक रोहोकले,तानाजी पवार, सुरज कदम,सुजय हिवाळे,सचिन लोळगे, अनुप झाडबुके,संकेत धिवर,राजेंद्र केकाण, संदिप कव्हळे यांनी केली आहे