महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा उपनगरात जप्त तोफखाना पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा तोफखाना पोलिसांनी जप्त करत मुद्देमालासह एकावर गुन्हा दाखल केला आहे.
सचिन संभाजी उंडे (रा. सिद्धिविनायक नगर जुना पिंपळगाव रोड अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्या घरातून विक्री करण्यासाठी आणून ठेवलेला २० हजार रु.किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती,तोफखाना पोलीस स्टेशन निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी. उज्वलसिंह राजपूत,पोहेकॉ.दत्तात्रय जपे,सुनील शिरसाट, भानुदास खेडकर,अहमद इनामदार,सुरज वाबळे, वसीम पठाण,सुमित गवळी,शिरीष तरटे, सतीश त्रिभुवन,दत्तात्रय कोतकर,बाळासाहेब भापसे,सतीश भवर यांनी केली आहे.पुढील तपास मपोहेकॉ.संजीवनी नेटके या करीत आहे.