अहिल्यानगर प्रतिनिधी:-सारसनगर येथे राहणारा सराईत गुन्हेगार ऋषिकेश उर्फ भावड्या अशोक बडे यास भिंगार कॅम्प पोलिसांनी MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे.
सदरील गुन्हेगार हा अत्यंत सराईत असून त्याच्यावर खूनाचा प्रयत्न,दरोडा,खंडणी,वाहनांवर पेट्रोल टाकून नुकसान करणे,घातक शस्त्राने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसण्यासाठी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी.जगदीश मुलगीर यांनी MPDA कायद्यान्वये प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना सादर केला होता.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यास स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले त्यावरून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन यांनी आरोपीस ताब्यात घेऊन नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे त्यास स्थानबद्ध केले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर,पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे,सहायक फौजदार कैलास सोनार,रमेश वराट,पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक शिंदे,रवी टकले,प्रमोद लहारे,अमोल आव्हाड, महादेव पवार यांनी केली आहे.