Maharashtra247

जेऊर येथील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा डांबून ठेवलेल्या जनावरांची केली सुटका

 

अहिल्यानगर प्रतिनिधी:-अहिल्यानगर जिल्ह्यातील बायजाबाई जेऊर येथील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ९ आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल करून तब्बल 6 लाख 20,000/-रू. किं.मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. नमुद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे,बबन मखरे,बापुसाहेब फोलाणे,ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे,विजय ठोंबरे,रोहित येमुल, शिवाजी ढाकणे, आकाश काळे व अरूण मोरे अशांचे पथक तयार करुन एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले. दि.16 डिसेंबर 2024 रोजी पथक एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बायजाबाई जेऊर, ता.अहिल्यानगर येथे इकलास मुनाफ शेख व इतर इसमांनी गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने डांबुन ठेवलेले आहेत.

तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष कसाईवाडा,बायजाबाई जेऊर येथे जाऊन खात्री करता एका पत्र्याचे शेडमध्ये गोवंशीय जनावरे डांबुन ठेवल्याचे दिसुन आले.त्यावेळी तेथील इसम पथकास पाहुन पळून जाऊ लागले पथकातील पोलीस अंमलदार यांनी पळून जाणाऱ्या इसमांना पाठलाग करून एका इसमास ताब्यात घेतले.त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव इकलास मुनाफ शेख, रा.कसाईवाडा, बायजाबाई जेऊर, ता.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. त्यास पळून गेलेल्या इसमांची नावे विचारली असता त्याने मुनाफ रफीक शेख (फरार), सोनु रफीक शेख (फरार),मुनाफ चाँद शेख (फरार),आयाज शब्बीर कुरेशी (फरार), फैयाज शब्बीर कुरेशी (फरार),समीर निसार कुरेशी (फरार) सर्व रा.कसाईवाडा, बायजाबाई जेऊर,ता. अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. तसेच डांबून ठेवलेल्या जनावरांबाबत विचारपूस करता त्याने जनावरे ही नूर मोहमंद कुरेशी (फरार),रा.ममदापूर, ता.राहाता व बाबु दाऊद कुरेशी (फरार),रा.चांदा, ता.नेवासा यांनी कत्तल करण्यासाठी दिली असल्याचे सांगीतले.

पथकाने घटना ठिकाणावरून 2,50,000/-रू.किं. त्यात 5 गायी, 1,00,000/- रू.किं. त्यात 5 गोवंशीय गोऱ्हे, 2,70,000/- रू किं. त्यात 9 गोवंशीय कालवडी असा एकुण 6,20,000/-रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.वर नमूद 09 आरोपी विरूध्द एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. 919/2024 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (अ) (ब) 9प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायदा कलम 3,11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

 

You cannot copy content of this page