संगमनेर प्रतिनिधी (दि.२१ जानेवारी):-बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम मशीनचा पत्रा वाकून त्यातील पैसे काढण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे.ही घटना शनिवार 21 जानेवारी रोजी मालपाणी हॉस्पिटल जवळ ता.संगमनेर येथील एटीएम मध्ये घडली आहे.अक्षय संजय जवरे (वय 29 वर्ष,धंदा नोकरी,रा.गणेश नगर गल्ली नंबर.14 ता.संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1)मंगेश बाळू गांगर्डे वय 20 वर्ष रा.चास ता.अकोले 2)एक अनोळखी इसम यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये भादवीक 379,511,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील मंगेश बाळू गांगुर्डे याला रॉड व जाड टामीसह पोलिसांनी अटक केली आहे तर त्याचा दुसरा साथीदार फरार झाला आहे.पुढील तपास पोसई/जाधव करीत आहेत.
