नगर प्रतिनिधी (दि.20 जानेवारी):-अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर दुचाकीच्या अपघातात नगरमधील लेबर कोर्टचे कामकाज पाहणारे प्रसिद्ध नामवंत वकील ॲड.अनिरुद्ध रामचंद्र टाक यांचा पुलावरील वळणावर आज दि.२० जानेवारी रोजी रात्री ८.२५ च्या सुमारास अपघात झाला त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ॲड.अनिरुद्ध टाक हे आपल्या दुचाकीवरून जात होते त्याच दरम्यान एक वाहन त्यांना धडक देऊन निघून गेले त्यात त्यांना जबर मार लागला आणि त्यातच ते मृत्युमुखी पडले.
