गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा २ जानेवारी २०२५ पासून आमरण उपोषण पीडित विधवा महिलेचा पोलीस प्रशासनाला इशारा
भिवंडी (दि.२७ प्रतिनिधी):-भिवंडी भाग्यनगर कामतघर येथील पीडित विधवा महिलेने आता पोलीस प्रशासनाला २ जानेवारी २०२५ पर्यंत अल्टिटेम दिला आहे तसेच उपोषणाचा इशाराही दिला आहे.
अर्जदार कमल भीमराव शिरसाठ यांनी अप्पर पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मी वरील ठिकाणची रहिवासी असून विधवा आहे.मला व माझा मुलगा नामे साईनाथ भीमराव शिरसाठ यास आदित्य अशोक पाईकराव,नाना,अशोक पिंट्या,संगीता,सिद्धार्थ,गणेश,मयूर,विकी शितोळे,चेतन सरदार व इतर ७ ते ८ जणांनी लाकडी बॅट बांबूने दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी बेदम मारहाण करत जखमी केले असून तसेच चारचाकी वाहनांची नुकसान करत तोडफोड करत घरात बळजबरीने घुसून खिडक्यांच्या काचेची तोडफोड केली आहे.तसा मारहाणीचा व्हिडिओ पण व्हायरल झाला आहे.व याबाबत मी दिलेल्या फिर्यादीवरून भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२६७/२०२४ बीएनएस ३३३,११८(१),११५(२),३५२,३५१(२),३२४(४),१८९(१),१९१(२),१८९(३),१९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंतु इतका गंभीर गुन्हा दाखल होऊन हि पोलिसांना आरोपी अद्यापही सापडत नाही.हे आरोपी अत्यंत भयानक असून त्यांनी आम्हाला मारहाण केल्यापासून ते आमच्या घराजवळून जातायेत येतायेत व आम्हाला धमक्या देत आहेत की तुम्हाला येथे राहू देणार नाही,पोलीस आमचे काहीच वाकडे करू शकत नाही,तुम्हाला जीवच मारून टाकू त्यामुळे आमच्या जीवितास या आरोपींकडून धोका निर्माण झाला आहे.तसेच आमच्या घरामध्ये ५ ते ६ लहान मुले असून ते या मारहाणी मुळे अत्यंत भयभीत झाले असून ते शाळेमध्ये जाण्यास तयार नाही तसेच नुकतीच कल्याण मध्ये लहान मुलीवर अत्याचार घडल्याचीही घटना घडली आहे त्यामुळे मुलांच्या मनावर परिणाम झाला असून ते अत्यंत भयभीत झाले आहे याला सर्वस्वी जबाबदार या घटनेतील आरोपी आहेत.त्यामुळे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते त्यामुळे या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्ही सहकुटुंब दि.२/१/२०२५ रोजी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.