Maharashtra247

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ३ लाखांचा मुद्देमाल जप्त तर १६ गोवंशीय जनावरांची सुटका 

 

अहिल्यानगर (दि.२९ प्रतिनिधी):-संगमनेर शहरामधील 2 कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीकडून 3 लाख 10,000/-रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन 16 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्हयातील महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या अवैध गोमांस विक्री करणाऱ्यांची माहिती काढुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.

नमूद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे,संतोष लोढे, गणेश भिंगारदे, सोमनाथ झांबरे,रोहित येमुल,किेशोर शिरसाठ, रणजीत जाधव, जालींदर माने, रमिजराजा आत्तार, महादेव भांड अशांचे पथक तयार करून संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते.दि. 28 डिसेंबर 2024 रोजी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार अवैध गोमांस व्यावसायिकांची माहिती घेत असताना,पथकास जोर्वे रोड,संगमनेर येथे दोन ठिकाणी गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्त्ल करण्याचे उद्देशाने निर्दयतेने डांबुन ठेवलेले आहेत अशी माहिती मिळाली.पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पंचासमक्ष मिळालेल्या माहितीतील दोन ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली.

पथकाने केलेल्या कारवाईमध्ये संगमनेर शहर पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. केलेल्या कारवाईमध्ये आरोपीचे ताब्यामधुन एकुण 16 जनावरे त्यामध्ये 6 गायी,2 बैल्, 4 गोवंश गोऱ्हे, 4 कालवड असा एकुण 3,10,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पथकाकडून संगमनेर शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या गुन्हयांची माहिती खालीलप्रमाणे आहे.अ.नं. पोलीस स्टेशन व गुरनं हस्तगत मु्द्देमाल आरोपीचे नाव

1 संगमनेर शहर गुरनं 1070/2024 2,00,000/- कबरअली गुलाम सौदागर, रा.जमजम कॉलनी, संगमनेर, जि.अहिल्यानगर ( फरार )

2 संगमनेर शहर गुरनं 1071/2024 1,10,000/- फारूख युसूफ सय्यद, वय 32, रा.अलकानगर, जोर्वे, संगमनेर, जि.अहिल्यानगर

सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,श्री.कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

 

You cannot copy content of this page