Maharashtra247

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर व वापर करणाऱ्यांवर ही फौजदारी गुन्हे दाखल करा जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन 

 

 

अहिल्यानगर (दि.२९ प्रतिनिधी):-नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या बरोबरच त्याचा वापर करणाऱ्यावरही फौजदारी गुन्हे दाखल व्हावे‌.प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तू पासून बनविलेल्या नॉयलांन मांजा या नावाने परिचित असलेल्या धाग्यामुळे पक्षांना तसेच मानवी जीवीतांस तीव्र ईजा होण्यचा धोका असतो.हे कापलेले धागे पतंगासोबत जमिनीवरच राहतात आणि ते जैवविघटनेशील नसल्यामुळे मातीमध्ये मिसळतात.

गटारे अडवणे ड्रेनेज लाईन,नद्या,नाले यासारखे नैसर्गिक पाण्याचे मार्ग माती यावर विपरीत परिणाम होतात.पडलेले धागे कापून पडल्यामुळे गुरेढोरे गायी आणि इतर प्राणी नायलॉनसह इतर पदार्थ खातात.त्यामुळे राज्य सरकारने ( १९८६ )च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम (५) नुसार या मांजाच्या विक्री व वापरावर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. केवळ दंडात्मक कारवाई केल्याने घातक मांजा विक्री व वापर करणाऱ्या जरब बसत नसल्याने संबंधितावर इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याने व पर्यावरणाचे नुकसान केल्याबाबत फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे.

नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घातक नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आलेल्या आरोपींवर आता मोक्का तसेच तडीपारी अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देत दोन जणांवर तशी कारवाई सुरू केली आहे.त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातही ही कारवाई होणे आवश्यक आहे‌.मांजा सापडेल ते ठिकाण सील करावं अल्पवयीन मुलाकडे नायलॉन मांजा कुठून आणला याची माहिती लपवली तर पालकांवरही फौजदारी गुन्हा दाखल करावा. असे आदेश न्यायला मार्फत दिले आहेत ‌ त्यानुसार ज्या ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री व साठवणूक सापडेल त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाया न करता ते ठिकाण सील करण्यात यावे.व मांजाचा वापर करणाऱ्यावर व वापर करणारे जर अल्पवयीन असले तर त्यांच्या पालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

तरी दिलेल्या निवेदनावर गांभीर्यपूर्वक विचार करून लवकरात लवकर दखल घेण्यात यावी असे निवेदन अहिल्यानगर जिल्ह्यातील मा.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला यांच्या बरोबर चर्चा करून देण्यात आले या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनिभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,जिल्हा उपसचिव आकाश ठाकूर,म.न.पा कामगार युनियन उपाध्यक्ष अजय सौदे,सामाजिक कार्यकर्ते दिलीप सुर्यवंशी,गोविंद घोडके,विकास पंडित,संजय खरे,पवन सेवक,धीरज बैद आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

You cannot copy content of this page