अकलूज प्रतिनिधी:-पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.प्रा.जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या आदेशाने पक्षाचे संघटन अधिक मजबूत होण्यासाठी माळशिरस तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांची निवड महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी जाहीर करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पत्र दिले.
दि.२९ डिसेंबर रोजी अकलूज गणेश नगर येथील संपर्क कार्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना पत्र देण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या माळशिरस महिला तालुकाध्यक्षा स्वातीताई धाईंजे,शहर महिला आघाडी कार्याध्यक्षा पुष्पा भडांगे, तालुका कार्यकारणी सदस्य सागर झेंडे,शहर संपर्कप्रमुखपदी इमरान शेख यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी सोमनाथ भोसले म्हणाले की नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा वापर पक्ष वाढीसाठी तसेच अन्याय अत्याचार विरोधात काम करण्यासाठी करावा.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष विश्वास उगाडे,तालुका युवक अध्यक्ष कबीर मलानी,तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे,तालुका प्रसिद्धीप्रमुख संदीप तोरणे,अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे,शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे, ऋषिकेश गायकवाड, अभिषेक पवार,यासह पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.