कोळना(चोरे)येथे टेनिस बॉल क्रिकेटचे खुले सामने २४ जानेवारी पासून होणार सुरू विविध प्रकारचे पुरस्कार आयोजकांकडून सामन्यात टीमसाठी देण्यात येणार
वर्धा जिल्हा प्रतिनिधी(सागर झोरे):-गणराज्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर श्री संत गाडगेबाबा क्रीडा मंडळ कोळना चोरे यांच्या तर्फ २४ जानेवारीला भव्य टेनिस बॉल क्रिकेटचे खुले सामने संत गाडगे बाबा क्रिडांगणावर आयोजित केले आहे.या टेनिस बॉल क्रिकेटच्या खुल्या सामन्यामध्ये प्रथम पुरस्कार २० हजार रुपये रोख,तर द्वितीय पुरस्कार १५ हजार रुपये रोख,तृतीय पुरस्कार १० हजार रुपये ठेवण्यात आलेले आहे.या सामन्यामध्ये प्रवेश फ्री ७०१ रुपये ठेवण्यात आली आहे.या टेनिस बॉल सामन्याचे उद्घाटन २४ जानेवारीला खा.रामदास तडस,गजानन रुद्रकार,नाना थोटे,राजेश बकाने,प्रमुख पाहुणे ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच,व सर्व ग्रामपंचायत सदस्य या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहे.टेनिस बॉल क्रिकेट सामन्याला यशस्वी करण्यासाठी अरविंद राजूरकर,शुभम डोफे,अक्षय मुनेश्वर,अतिश मुनेश्वर,आदी मंडळाचे सदस्य प्रयत्न करणार आहे.