धरणात लघुशंका करणारे इतिहासात लघूशंका करायला लागले-हिंदुराष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाई
पुणे प्रतिनिधी (किरण शिंदे) दि.२२ जानेवारी):-हिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.पुण्यात आज रविवार दि.22 जानेवारी रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीका केली.संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते म्हणणारे शाहिस्तेखान अफजल खान यांच्या कुळातलेच असावेत.धरणात लघुशंका करणारे आता इतिहासात लघुशंका करायला लागलेत अशी खरपूस टीका अजित पवार यांच्यावर केली.