हिवरगाव प्रतिनिधी-(नितीन भालेराव):-नौरोसजी वाडिया महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी मॅक ऑर्थर जीनियस फेलोशिप प्राप्त इतिहास संशोधक प्रा.डॉ.शैलजा पाईक यांचा विशेष गौरव करण्यात आला.
प्रा.डॉ.शैलजा पाईक यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिलांच्या जीवन शैलीवर आधारित संशोधनात्मक लेखनाबद्दल त्यांना मॅक ऑर्थर जीनियस (युएसए) फेलोशिप प्राप्त केल्याबद्दल नौरोसजी वाडिया महाविद्यालयात विशेष गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रा.डॉ.शैलजा पाईक यांचा मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा.सचिन सानप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमास माजी प्रिन्सिपल डॉ.ॲस्टन सर,माजी प्राचार्य खरे मॅडम,माजी उपप्राचार्य कुंदे मॅडम,संशोधक मिलिंद कसबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विलास आढाव,उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ. शैलजा पाईक यांनी आपल्या मॅकऑर्थर जीनियस (USA) या फेलोशिपच्या प्रवासाबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. समाजात मानवविद्या शाखेला विज्ञान आणि वाणिज्य शाखेपेक्षा कमी समजले जाते अशी खंत व्यक्त करून पालकांनी आपल्या पाल्यांना मानव विद्याशाखेत शिकण्यास आणि संशोधन करण्यास प्रोत्साहन द्यावे असे आवाहन प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना केले.संशोधन विषय कसा निवडावा,संशोधनात कोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळवावी याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.या त्यांच्या यशस्वी वाटचालीत नातेवाईक, शेजारी, शाळा आणि कॉलेजमधील शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
तसेच तमाशा क्षेत्रात प्रथम प्रदार्पण करणा-या आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांचे पणतू नितीनचंद्र भालेराव,रंजना भालेराव यांनी प्रा.डॉ.शैलजा पाईक यांचा सत्कार केला.कला साम्राज्ञी पवळा कला मंचाच्या वतीने प्रा.डॉ.शैलजा पाईक यांचा शाल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तर कार्यक्रमाचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत चाबुकस्वार आणि प्रास्ताविक मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा.सचिन सानप यांनी केले.प्रा.डॉ.शैलजा पाईक यांची ओळख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वृषाली रणधीर यांनी करून दिली आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉ. ज्योती अनिरुद्ध यांनी केले.
सदर कार्यक्रमास मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. सचिन सानप आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार,इतिहास विभाग प्रमुख ज्योती अनिरुद्ध आणि इतिहास विभागातील सर्व प्राध्यापकांचे बहुमोल सहकार्य लाभले.तसेच सदर कार्यक्रमा करिता प्रा.डॉ.शैलजा पाईक यांच्या मातोश्री सरिता पाईक,बहिणी रोहिणी वाघमारे आणि किर्ती पाईक-इनकर,मेहुणे अशोक वाघमारे आणि अमित इनकर,हर्षवर्धन सोरटे,अशोक वाघमारे सर,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना राज्य महिला आघाडी प्रमुख सुकेशिनी मोरे मॅडम,शिक्षक,कुटुंबीय,नातेवाईक तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य समीना बॉक्सवाला-काळे,उपप्राचार्य बहुले,रजिस्ट्रार राजेंद्र तागडे,सर्व शाखांचे अधिष्ठाता,विभाग प्रमुख,विभागातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर वर्ग विध्यार्थी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.