नगर प्रतिनिधी (दि.२३ जानेवारी):-गेल्या २५ वर्षांपासून नगरकरांना टेलरींगची दर्जेदार सेवा पुरविणारी प्रोफेसर चौकातील स्टोयलो टेलर ही लोकप्रिय फर्म नूतनीकृत दालनाच्या माध्यमातून अत्याधुनिक रूपात ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.माऊली सभागृहाच्या समोर स्टायलो लिनन कस्टम टेलरींग या विस्तारीत लिनन कापड विक्री व टेलरींग सेवेच्या नूतनीकृत दालनाचे मंगळवार,दि.२४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.अशी माहिती संचालक वज्रेश्वर श्रीपत व रमेश श्रीपत बंधू यांनी पत्रकार परिषदेत दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोहिनूर मॉलचे संचालक अश्विन गांधी राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अरूणकाका जगताप,मा.आ.दादाभाऊ कळमकर,महापौर सौ.रोहिणीताई संजय शेंडगे,तोफखाना पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके उद्योगपती मोहनशेठ मानधना,न्यू आर्टस महाविद्यालयाचे प्राचार्य भास्करराव झावरे,समाजसेवक श्रीकुमार शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.स्टायलो टेलर फर्मबद्दल माहिती देताना वज्रेश्वर श्रीपत यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की १० वी नापास झाल्यावर करावे काय घरची आर्थिक परिस्थिती खराब होती परंतु काम करणे गरजेचे होते प्रथम पानाची टपरी चालवली परंतु त्यात काही मन रमेनासे झाले त्याच दरम्यान लहान भाऊ टेलरिंग शिकत होता शिकत असताना विचार आला की स्वतःचेच एक नवीन दुकान टाकावे व मनात निश्चय करून धाडस करून नगर तालुक्यातील वाळकी येथे प्रथम दुकान चालू तेथील नागरिकांचा प्रतिसाद पाहून व या सर्व खडतर प्रवासावर मात करून नगर शहरातील अत्यंत गजबजलेल्या प्रोफेसर चौकात १९९७ मध्ये स्टायलो टेलर ही फर्म आम्ही सुरू केली.गेल्या २५ वर्षांत ग्राहकांना दर्जेदार सेवा देतानाच व्यवसायात काळानुरूप बदलही केले.टेलरींग क्षेत्रात स्टायलो टेलर नाव नगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.गेल्या काही वर्षात लिननच्या कपड्यांना ग्राहकांची मागणी वाढली आहे.सण-उत्सव, लग्नसमारंभ अशा विविध ठिकाणी लिननचे कपडे परिधान करण्याला लोक मोठ्या प्रमाणावर पसंती देतात.त्यामुळे लिनन विक्रीही आम्ही करीत होतो.आता या दालनात लिननचे मनपसंत कपडे मिळण्याची सेवाही पुरविण्यात येणार आहे.लिनन कापड विक्री व टेलरींग सेवा असे एकत्रित स्टायलो लिनन कस्टम टेलरिंग हे विस्तारीत ४०० स्केअर फुटांचे दालन माऊली संकुलाच्या समोर, झोपडी कॅन्टीन येथे ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.गेल्या २५ वर्षांपासून विश्वासाची समृध्द परंपरा जपणारे श्रीपंत बंधू आता स्टायलो लिनन कस्टम टेलरींग या नव्या विस्तारीतव अत्याधुनिक दालनाच्या रूपात नगरकरांना सेवा देणार आहेत.या कार्यक्रमास उपस्थित राहून सेवेची संधी द्यावी,असे आवाहन संचालक वज्रेश्वर श्रीपत व रमेश श्रीपत यांनी केले आहे.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”
