पारनेर प्रतिनिधी (दि.२३ जानेवारी):-अहमदनगर पुणे महामार्गावर तसेच सुपा-पारनेर रोडवरील अनाधिकृत बांधकाम धारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या नोटीसांची मुदत संपुनही कारवाई नाही याचा अर्थ या नोटीसा हप्ते वसुल करण्यासाठी तर नाहीत ना मनसेचा सवाल..? महामार्गावरील अपुर्ण कामं,असुविधा,खड्डे निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे एक महिन्याच्या आत महामार्ग परत जैसे थे तरिही टोलवसुली जोरदार चालु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे आणी चेतक एंटर प्रायजेसचे १००% साठेलोटे असल्याचा गंभीर आरोप मनसे नेते अविनाश पवार यांनी केला आहे.चेतक एंटर प्रायजेस कडुन नगर-पुणे महामार्गावर रस्ता सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अपयशी ठरल्या मुळे अधिकाऱ्यांनी स्वतःहुन आपल्या खुर्च्या खाली कराव्यात अशी मागणी अविनाश पवार मनसे माथाडी कामगार सेना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष यांनी केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाला पञव्यव्हार करुन पण महामार्गावर तुटपुंजी कामं करुन वेळ काढू भुमिका संशयास्पद असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले नगर-पुणे महामार्गावर पडलेले खड्डे रस्तावर झालेले अनाधिकृत बांधकाम तसेच अपुर्ण कामं तोडलेली अनाधिकृत पणे डिव्हायडर , खचलेल्या साइडपट्या,सुचना फलक,रिफ्लेक्टर,तसेच मदतीसाठी हेल्पलाईन नंबर,महामार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांच्यासाठी स्वच्छता गृह या मुलभुत सुविधा बंधनकारक असताना सुद्धा चेतक एंटर प्रायजेसचा मनमानी कारभारामुळे अनेक निरपराध कुटुंब उध्वस्त होत आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वेळोवेळी पञव्यव्हार करुन पण तुट पुंजी कामं करुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या कडे गांभीर्याने न घेता याकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे या गोष्टीचा गांभीर्याने विचार करुन लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने झोपेच सोंग घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्ग विरोधात आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी व महामार्गावर सतत निरपराध नागरिकांना आपला जिव गमवावा लागत असल्याने अधिकारी एसी मध्ये निवांत बसून आहेत त्यामुळे या अधिकार्यांना खुर्चीवरून हटविण्यासाठी उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे मनसे माथाडी कामगार सेना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अविनाश पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
