Maharashtra247

तब्बल 23 गुन्हे दाखल असलेला तसेच महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढणाऱ्या कुख्यात आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

 

नगर प्रतिनिधी (दि.२३ जानेवारी):-अहमदनगर शहर व भिंगार येथील महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढुन चैन स्नॅचिंग चोरी करणारा आरोपी 3,52,000/- (तीन लाख बावन्न हजार) रुपये किंमतीचे 6.4 तोळे (64 ग्रॅम) वजनाचे दागिन्यासह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. बातमीची हकिगत अशी की, दि.15/01/23 रोजी फिर्यादी सौ.माया किरणकुमार वनारसे(वय 40,रा.प्लॉट नं.12,सुर्यानगर,तपोवन रोड, अहमदनगर)या नगर औरंगाबाद रोडवरील फिरोदिया वृध्दाश्रमा समोरुन जात असताना पाठीमागुन एक अनोळखी इसम काळे रंगाचे मोटार सायकलवर येवुन फिर्यादीचे गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे 50,000/- रुपये किंमतीचे मिनीगंठण ओढुन तोडुन बळजबरीने चोरुन घेवुन पळुन गेला.सदर घटनेबाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं. 24/2023 भादविक 392 प्रमाणे आरोपी विरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.नमुद घटना घडल्यानंतर श्री. राकेश ओला पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना नाउघड गुन्हा उघडकीस आणणे करीता विशेष पथक नेमुण कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक,मनोहर शेजवळ पोहेकॉ/विजयकुमार वेठेकर,संदीप घोडके,देवेंद्र शेलार,पोना/शंकर चौधरी, राहुल सोळुंके,लक्ष्मण खोकले,रणजीत जाधव, ज्ञानेश्वर शिंदे,संदीप दरदंले, मच्छिंद्र बर्डे व चापोना/भरत बुधवंत अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुण नाउघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास लागलीच रवाना केले.स्थागुशा पथक श्रीरामपूर परिसरात फिरुन नाउघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असताना पोनि/श्री अनिल कटके,स्थागुशा यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,एक इसम चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी श्रीरामपूर येथील शिवाजी चौकात येणार आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोनि/श्री.कटके यांनी सदर मिळालेली माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.नमुद आदेशान्वये पथक तात्काळ शिवाजी चौक येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना एक संशयीत इसम पोलीस पथकास पाहुण पळुन जावु लागला.पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)रियाज फैय्याज इराणी(वय 42,रा.इराणी गल्ली,ता.श्रीरामपूर) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला.त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्याने डिसेंबर व जानेवारीमध्ये अहमदनगर शहर परिसरात साथीदारासह चैन स्नॅचिंग गुन्हे केले असुन त्यामधील सोने विक्री करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.आरोपीचे साक्षीदाराचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.आरोपीने दिलेल्या कबुली अनुषंगाने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख तपासले असता खालील प्रमाणे एकुण -03 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहेत.

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. कोतवाली 1023/2022 भादविक 392, 34

2. कोतवाली 19/2023 भादविक 392

3. भिंगार कॅम्प 24/2023 भादविक 392

वरील गुन्ह्यात चोरीस गेलेले एकुण 3,52,000/- (तीन लाख बावन्न हजार) रुपये किंमतीचे 6.4 तोळे (64 ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने आरोपी नामे रियाज फैय्याज इराणी याचे ताब्यात मिळुन आल्याने त्यास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं. 24/2023 भादविक 392 या गुन्ह्यात पुढील कायदेशिर कारवाई करीता हजर केले आहे.पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे रियाज फैयाज इराणी याचे विरुध्द पुणे,नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात जबरी चोरी,चैन स्नॅचिंग व फसवणुक असे एकुण-20 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे-

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. भद्रकाली (पुणे) 363/2016 भादविक 392, 34

2. पुणे 139/2013 भादविक 392, 34

3. समर्थ (पुणे) 30/2013 भादविक 392, 34, 341

4. पिंप्री (पुणे) 109/2010 भादविक 420, 170, 34

5. चतुश्रृंगी (पुणे) 110/2013 भादविक 392, 34

6. पंचवटी (नाशिक) 524/2016 भादविक 392, 34

7. पंचवटी (नाशिक) 376/2013 भादविक 392, 34

8. उपनगर (नाशिक) 3657/2015 भादविक 392, 34

9. इंद्रानगर (नाशिक) 335/2018 भादविक 392, 34

10. गंगापुर (नाशिक) 333/2016 भादविक 392, 34

11. इंद्रानगर (नाशिक) 349/2017 भादविक 392, 34

12. मसरुळ (नाशिक) 202/2018 भादविक 420, 170

13. शाहुपुरी 245/2018 भादविक 420, 170, 34

14. सरकारवाडा (पुणे) 406/2016 भादविक 392, 34

15. तोफखाना 173/2022 भादविक 392

16. भिंगार कॅम्प 95/2022 भादविक 392

17. कोतवाली 19/2023 भादविक 392

18. कोतवाली 23/2023 भादविक 392, 34

19. भिंगारकॅम्प 24/2023 भादविक 392

20. शेवगांव 09/2023 भादविक 392, 34

सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर व श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page