नगर प्रतिनिधी (दि.२४ जानेवारी):-संभाजी नगर, नेवासा येथुन घराचे समोर लावलेली महिंद्रा कंपनीची बोलेरो कार चोरी करणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. बातमीची हकिगत अशी की, दिनांक 25/12/2022 रोजी फिर्यादी श्री.अमंजी अजमुद्दीन बागवान (वय 47,धंदा व्यापार,रा.संभाजीनगर, नेवासा खुर्द,ता.नेवासा) यांनी त्यांचे मालकिची महिंद्रा कंपनीची बोलेरो कार क्रमांक एमएच/17/बीडी/5313 ही घरा समोर लावुन कुटूंबियासह जेवण करुन रात्री झोपी गेले व सकाळी उठल्यावर त्यांना घरासमोर लावलेली बोलेरो कार दिसली नाही त्यामुळे फिर्यादी यांनी कुटूंबियासह बोलेरो गाडीचा घराचे आजु बाजुला शोध घेतला परंतु मिळुन आली नाही.सदर घटने बाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी वरुन नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. 1178/2022 भादविक 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर घटना घडल्यानंतर श्री. राकेश ओला पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनकर मुंडे,पोहेकॉ/मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे,संदीप घोडके,पोना/शंकर चौधरी, संतोष लोढे,संदीप दरदंले,ज्ञानेश्वर शिंदे,पोकॉ/शिवाजी ढाकणे,विजय धनेधर,चापोहेकॉ/संभाजी कोतकर व चापोना/भरत बुधवंत अशा पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक नेमुण सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. नमुद सुचना प्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार राहुरी परिसरात पेट्रोलिंग करुन आरोपींचा शोध घेत असतांना पोनि/अनिल कटके,स्थागुशा यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,नमुद गुन्ह्यातील बोलेरो ही इसम नामे तौफिक पठाण रा. श्रीरामपूर याने चोरी केली असुन तो बेलापुर ते श्रीरामपूर जाणारे रोडवर आला असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले.पथक बेलापुर-श्रीरामपूर जाणारे रोडवर सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम येताना दिसला पथकाची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले.पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) तौफिक राजु पठाण,वय 22, रा.शिवनेरी गल्ली,बेलापुर, ता.श्रीरामपूर असे सांगितले. त्याचेकडे नमुद गुन्ह्याबाबत चौकशी करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन बारकाईने चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदारासह केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेतले.त्याचे इतर साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.आरोपी नामे तौफिक राजु पठाण हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात चोरी व पोक्सो असे गंभीर स्वरुपाचे एकुण-02 गुन्हे दाखल आहेत. ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. श्रीरामपूर शहर 240/2019 पोक्सो ऍ़क्ट 8, 12
2. नेवासा 1178/2022 भादविक 379
ताब्यात घेतलेल्या आरोपीस नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील कारवाई नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
