यशवंत विद्यालय सेवाग्राम येथे सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन
वर्धा जिल्हा प्रतिनिधी(सागर झोरे):- स्थानिक यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,सेवाग्राम व भागशाळा खरांगना ( गोडे) येथे आज दि.२०/०१/२०२३ शुक्रवार ते २६/०१/२०२३ गुरूवार पर्यंत सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या अतंर्गत दि. २०/०१/२०१२ शुक्रवारला सामुदायीक आरोग्य विभाग, सेवाग्राम मार्फत ‘आरोग्याची वारी आपुल्या दारी’ , स्काऊट गाईड मार्फत ‘आनंद मेळावा’ व मातापालक शिक्षक संघा मार्फत ‘हळदि कुंकू’ कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.समीरभाऊ देशमुख (अध्यक्ष, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा) हे होते. श्री.सतीशराव राऊत (उपाध्यक्ष यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा) प्रमुख अतिथी महाविद्यालयातील प्राचार्य श्री.प्रभाकरराव टेकाडे,पर्यवेक्षिका सौ. वंदना राऊत, शिक्षक प्रतिनिधी श्री.संजय देशमुख, जेष्ठ शिक्षिका सौ. अनिता भिसे, प्रमुख मार्गदर्शक मा. डाॅ. कु. राधिका शर्मा (HOD सामुदायीक वैद्यक विभाग, सेवाग्राम), परीक्षक सौ. जयश्री मांजरे (पालक), सौ. जे. एस. राऊत व सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सर्व प्रथम मान्यवराच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले व मान्यवराच्या हस्ते ‘आरोग्याची वारी आपुल्या दारी’, ‘आनंद मेळावा’, व ग्रंथालय’ यांचे उद् घाटन करण्यात आले. स्काऊट—गाईड विभागा मार्फत घेण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त गाईड कु.पायल राऊत, कु. मुस्कान शेख, कु. मेघा शेंडे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यांना मार्गदर्शन गाईडर कु. रूपा कडू यांनी केले. क्रिडा विभागामधुन जिल्हास्तर प्रथम येणारे विद्यार्थी करण येलमुले गोळाफेक व हिमांशु गौतम ५००० मीटर चालणे यात घवघवीत यश मिळविल्या बद्दल ट्राफी व प्रमाणपत्र देऊण गौरविण्यात आले. मार्गदर्शन क्रिडा शिक्षक श्री. अभय वाघ यांनी केले. विज्ञान विभागामधुन जिल्हास्तरावर प्रथम व राज्यस्तरावर सहभाग नोंदविणारी कु. वैष्णवी पाठक व चमु यांना ट्राफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मार्गदर्शन कु. कांचन गावंडे यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन कु.रूपा कडू , क्रिडा शिक्षक श्री.अभय वाघ व सौ.कांचन गावंडे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका सौ.वंदना राऊत यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व सामुदायीक आरोग्य विभाग कसतुरबा यांनी सहकार्य केले.